bhopale hanumant hanumantbhopale@gmail.com

19:46 (1 minute ago)
to me
मनं तोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द मनं जोडण्यासाठी उपयोगाचे नसतात.
   - डॉ हनुमंत भोपाळे

एखाद्या कारणांमुळे  अनेक वर्षे एकत्र असलेले दोन मित्र
मनानं दूर जातात.तरीपण सुखदुःखात एकमेकांना एकमेकांची आठवण येते.
लक्षात येते, खरंच मैत्रीचा बळी देऊन दूर होण्याइतके मोठे कारणं घडले नव्हते.रागाच्या भरात बोलून दूर गेलो,याची खंत अनेकांना वाटते.
 खरंच जिव्हाळ्याच्या माणसाइतका अहंकार महत्त्वाचा आहे का? मन दुखावले म्हणून काय मैत्रीचा बळी घ्यायचा असतो का ? मन माणसांच्या शब्दांमुळे दुखावलं जातं नाही त्या शब्दांना सहन करू न शकल्यामुळे, दुखावल्या जाते.एवढी सहनशीलता आपण कमावली नाही का? खरंच शब्दांना काही किंमत असते,वजन असते का?वजन असलं तरी आपल्या वजनापेक्षा अधिक वजन नसेल ना?मग हे शब्द माणसाला का बरं छळतात.मनबुध्दीच दळण करतात.
खरं तर शब्दांना आपण जितकी किंमत देतो तितके ते वजनदार, टोकदार होतात.नको वाटणा-या शब्दांनी कोमल नात्यावर प्रहार झाल्यास  मन जखमी होते.
 मैत्रीला ,नात्याला हळूवार,कोमल,प्रेमळ,धीर आणि आधार देणा-या शब्दांची गरज असते तर वाद करून माणसं दूर करण्यासाठी, त्यांना नामोहरम, अपमानित करण्यासाठी धारदार, तीक्ष्ण शब्दांची गरज असते.
.मनं तोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द जोडण्यासाठी उपयोगाचे नसतात.मग आपल्याला माणसं जोडायची आहेत की तोडायची आहेत, याचा विचार केला पाहिजे.
गैरसमज,लावालावारूपी इंधन मिळाले की,शब्द शस्त्राचं
रूप धारण करतात.
 असे शब्द मनाला जखमी करतात. जखमी झालेले मन वार केलेल्या मनाशी सहसा मिळून मिसळून प्रेमानं वागू शकत नाही. त्याचा दूर राहण्याकडे कल असतो.
दुराव्यातून दुरावा वाढतो. प्रेम, सेवा,नम्रता,क्षमा मागून  हा दुरावा हळूहळू कमी करता येऊ शकतो. याशिवाय गैरसमजामुळे दूर गेलेली माणसं  सत्यता कळली की, जवळ येऊ शकतात.पण बराच काळ हातातून गेलेला असतो.
आता भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे,असे मनात विचार येऊन जातात.
 भेटावे, बोलावं वाटलं तरी
 सुरूवात कुणी करायची असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो?
 अहंकारामुळे बोलत नाहीत. मी बोलायला तयार आहे, पण त्यांनं स्वत:हून
बोललं पाहिजे.त्याला गरज नसेल तर मग माझं काय अडलय,तो कोण कुठला लागून गेलाय , असेल गरज तर तो बोलेल,असा विचार करून मैत्रीचा हात पुढे करत नाहीत. मैत्रीसाठी हात पुढे न करणे मैत्रीचा घात करणं असू शकते.
        पुढच्या व्यक्तींच्या, मित्रांच्या ठिकाणी असलेले गुण,त्यांनं केलेले सहकार्य, मैत्रीचे महत्त्व लक्षात घेऊन कुणी तरी मन मोठं केलं पाहिजे.
जी माणसं स्वत:ला समर्थ समजतात,त्यांनी तरी मोठ्या मनानं मैत्रीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
आपण जर पुढाकर घेतला,स्वत:हून बोललो अन् त्यानं नीट प्रतिसाद दिला नाही तर विनाकारण नामुष्की होईल.तो पुन्हा कधी म्हणेल की,तुच आला होतास. मी आलो नव्हतो.मी बोललो नव्हतो.
खरंच किती विचार करते दुबळे मन.दुबळं मन, दुबळे विचार   आनंद देऊ शकत नाहीत.
      मैत्रीची जाळ विणत, मैत्री टिकून ठेवत जी माणसं पुढे जातात. कुठे कधी पटलं नाही, खटकले तरी चालत राहते, शेवटी माणूसं आणि माणुसकी महत्त्वाची आहे?  अहंकाराची टोपली बाळगून उपयोग आहे का? असा विचार करून अहंकारापेक्षा मित्र  महत्त्वाचा आहे.असा विचार करणारी माणसं मैत्रीभाव जागृत करून मन जुळवायला, जोडायला, घडवायला पुढे येतात ती माणसं खरंच मनानं मोठी असतात.छोट्या मनाच्या माणसांना मोठ्या मनाची,उंचीची माणसं समजायला वेळ लागतो.
 दुरावा ठेवून दुःखी होत बसण्यापेक्षा नक्कीच मैत्री,प्रेम, जिव्हाळा मोलाचा आहे,ही जाणीव ठेवून दूर गेलेली मनं एकत्र आणण्यासाठी सुईदो-याची भूमिका पार पाडणारी ,मैत्रीचा पूल बांधून देणारी माणसं महानच असतात.अशांची  संख्या कमी असते.आग लावणा-याची संख्या  मात्र विपुल दिसते.
डॉ .हनुमंत भोपाळे
9767704604

1 comment:

  1. खूप छान लिहिता सर तुम्ही 👏👏🙏

    ReplyDelete