Monday 30 March 2020

मानसिक स्वच्छतेची खूपच गरज असते.
    डॉ.हनुमंत भोपाळे
बहुतांश माणसं नियमितपणे तन,कपडे,घर स्वच्छ करतात.दातही.ही स्वच्छता केली नाही तर
दुर्गंधी पसरली जाते.शारीरिक आजार होतात अन् त्याचा उपद्रव इतरांना होतो.मानसिक स्वच्छता केली नाही तर
मानसिक आजार पसरतात.ह्यामुळेही स्वत:ला अन् इतरांना त्रास सहन करत जगावं लागते.
साबणने शरीर अन् सकारात्मक भावना, विचार आणि कल्पनेने मन,चित्त आणि बुद्धी स्वच्छ करता येईल.मग
आपलं आणि समाजाचे आरोग्य उत्तम राहील.
    यासाठी आपण आपल्या नकारात्मक विचार,भावना, कल्पना आणि दृष्टिकोनात बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
हे काम आपली तयारी असेल,आपण केले तरच होते.
विश्वकल्याणाची भावना,प्रार्थना फार उपयुक्त ठरते.
चीनच्या कोरोनाची माहिती झालेल्या डॉक्टरच्या मनात ही कल्याणाची भावना होती.पण ही भावना काही जणांनी रूजू दिली नाही.त्यामुळे जग कोरोनाला बळ पडत आहे.एक दृष्ट विचार आणि कृतीने काय घडू शकते, यासाठी हे जागतिक पातळीवरील उदाहरण दिले आहे.
            सर्वांनी वैयक्तिक पातळीवर आपली मानसिक तपासणी करून घेतली पाहिजे.जे विकृत ते ते काढून टाकले तरच विधायकता रूजेल, वाढेल.
यासाठी आपले विचार, भावना,कल्पना आणि दृष्टिकोन तपासून घेऊन योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी सिद्ध होणे सर्वांच्याच कल्याणासाठी उपकारक ठरणार आहे.
आपण आपल्या गरजेपेक्षा अधिक हाव करत असल्याने प्रकृतीवर,संस्कृतीवर घाव बसत आहेत अन् विकृतीला
बळ मिळत आहे.
आपल्या जीवनात सन्मान,यश , वैभव,मनासारखे नातेवाईक,
हवा त्या सहली, निवांत सहवास,प्रेमळ कुटुंब,आईवडिल, बहिण भाऊ आदी सगळे अन् तेही मनासारखं वागणारी माणसं भेटायलाच पाहिजे हा आग्रह असतो.आपण
कसंही वागलं तरी  चालते,इतरांनी आपल्या मनासारखं वागलं पाहिजे.अपेक्षांच्या
याद्या कधी तरी थांबवून
आहे त्यात आनंद मानत  वाटचाल आहोत की नाही?
भय तरी किती बाळगायचे.
सतत घेण्याचा विचार,
देण्याच नाव नाही.न देताच काही परत कसं मिळेल?
सतत स्वार्थानं आंधळ होऊन
निखळ आनंद नाही मिळत.
त्यागातही आनंद असतो,हे आपण
हे विसरूनच गेलोत.
सगळे माझ्यासाठी
अन् सगळं माझ्यासाठीच आधुनिक धोरण
माणुसकीला मारक ठरत आहे.
 दुराग्रह दुःखी करत आहे.
सगळ्यांनी आपल्याच मनासारखं वागावं बोलाव असं वाटतं
पण
ते खरंच शक्य आहे का?आपण तरी तसं करतो का?
एक काल्पनिक किस्सा आहे.
एकदा एकजण देवाला
म्हणाला
  "देवा मला न भांडणारी, शांत, प्रेमळ बायको मिळू दे!"
देव म्हणाला," तशी भेटत असली असती तर मी केली नसती का?
जे उपलब्ध नाही ते मागायचं नसते वत्सा"
यातला विनोद बाजूला केला,बायकोनंच चांगलं वागावं,आपण कसही वागलं तर सुख, शांती कशी नांदेल!
 खरं तर दुस-यांकडून अपेक्षा करण्याअगोदर आपण स्वत:ला
विचारले पाहिजे.
आपलं मन तरी आपलं ऐकतं का?
आपण तरी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतो का?
सगळ्या अपेक्षा पुर्ण करणं शक्य आणि आवश्यक तरी असते का?
आपलं मन घंट्याघंट्याला बदलते, राजकारणी माणसं टोपी बदलावे तसे.
सरड्यान रंग बदलावे तसे म्हटले तरी चालेल.
मग लोक बदलले तर एवढं दुःख वाटून घेण्याचं कारण काय?
परिवर्तन हा जगाचा नियम आहे.
जे जे बदलणं शक्य ते ते बदलून अन् जे जे बदलणं शक्य नसेल त्याचा स्वीकार करून
बदलासोबत समन्वय साधून जगता आलं तर काही तरी निश्चितच सुखकर वाट्याला येईल.मनासारखं घडलं
नाही तेव्हा  जे घडले ते मनासारखं आहे अशी मनाची समजूत घालून  जगणारी माणसं आनंदाने जगू शकतात.
     लोकांचा जन्म आपल्या मनासारखं वागायलाच
थोडाच झालाय.
त्यांचे वेगवेगळे ध्येय,आवडीनिवडी, आशाअपेक्षा आहेत.आग्रह, दुराग्रह,समज ,गैरसमज, अहंकार,स्वार्थ
द्वेष,मत्सर,राग आहेत.यापासून कोण अलिप्त आहे?
स्वत:भोवती फिरत राहिल्याने जग फिरून येता येतं नाही.
जितकं आपण अलिप्त, निरपेक्ष,क्षमाशील, सहनशील,
प्रेमळ आणि कार्यमग्न राहू तितकं मानसिक दुःख कमी जवळ येईल, एवढं आपल्या हाती आहे.
यासाठी रोज सकारात्मक बळ वाढवत
 वाटचाल करावी लागेल.
दुर्बलतेला काही फारसं सहन होत नाही.सहनशीलता, विधायक ध्येय  सोडून देणारे सामर्थ्य मिळवू शकत नाहीत.
साधनेने सहनशीलता अन् सामर्थ्य वाढतं जाते.
             इच्छा, अपेक्षा हे दुःखाचं मूळ असल्याचे
तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहेच.
इच्छा अपेक्षेचे घोडे इतक्या भयानक गतीने उधळत आहेत की,आनंदाचा चक्काचूर होऊन जात आहे.
आपण स्वत:ला विचारू या.
आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण करुन पाहू या.

आपलं ते बाब्या अन् लोकांचं ते कारटं ह्या संकुचित मनोवृत्तीने आपल्याला घेरले तरी नाही ना?
 संतुलितपणे , विवेकबुद्धी शाबूत ठेवून  वागता, बोलता,पाहता आले तर बरेच दुःखाचे ढग दूर करू होतील.दूर राहतील.
खरंच सगळ्यांचीच आपल्याला गरजेचं असते का?
सगळेच धावतपळत यावेत.आदरसत्कार , सहकार्य करावे,हा अट्टाहास
का बरं?
सगळेच आपल्याभोवती गोळा झाले तर आपण इतक्या लोकांना वेळ तरी देऊ शकतो का?
 विचारात बदल केला तर कधी कधी परिस्थिती बदलणार नाही पण मनःस्थिती बदलते.मग दुःख वाटत नाही.
एकजण छान लग्न पार पडल्यानंतर
हनिमूनचा आनंद घ्यायचा सोडून
नको ते विचार करीत बसला.
' कोण कोण
लग्नाला आले नव्हते?'
'का आले नसतील?मुद्दाम आले नसतील.'
'मी तर त्यांना पत्रिका दिली.फोन केला.
'मला येतो म्हणाले होते.खोटं बोलले.
आले नाहीत.'
बदमाश आहेत,असा नकारात्मक विचार करून
दुःखी होऊ लागला.
एवढ्यावरच तो थांबला नाही.
तो बायकोला म्हणाला"
तू पत्रिका दिलेले, बोलवलेले किती जण आले होते?
कोण कोण आले नव्हते ?
आठव जरा.
का आले नव्हते?
याचा शोध घे बरं"
ती म्हणाली,"झाले गेले गंगेला मिळाले.
भूतकाळ परत येत नसतो.
मी भूतकाळ पाहत नसते.
अहो," जे हआले होते त्यांना तरी नीट वेळ देऊ शकलो का?
सगळ्यांची गरज होती का?
आपण दोघे आलो असतो तरी जमलं असतं की.
कोण आले हे महत्त्वाचे नाही
आता आपण एकमेकांच्या अधिक जवळ येणं आणि
जवळ राहणं, समजून सांगण, समजून घेणे,सहन करणं,सेवा करणं,प्रेम देणं, एकमेकांना मुठीत ठेवण्याची धडपड न करता एकमेकांच्या मिठीत राहणं
हे गरजेचे आहे.तसं करू या
कामचं लक्षात ठेवून जगू लागलो की बिनकामचं बाजूला ठेवणं जमतं."
राजकारणी माणसासारखं
सर्वांचे आभार मानून मोकळे होऊ या."
एवढं सगळं ऐकून तो थोडा भानावर आला.
 खरं तर भूतकाळात जाऊन स्वत:ला दुःखी करत बसण्यापेक्षा वर्तमानात जगायला हवे तरच आनंदी राहू शकतो.
आनंदी राहिलो तरच आनंद देऊ शकतो.
विहीर असेल तरच पोह-यात कुठून येईल ?
लाईकवर लक्ष न देता लायकी वाढवत वाटचाल करणं अधिक हितकर ठरेल.
जे कंटाळलेत, जे टाळत आहेत त्यांना कवटाळण्यात अर्थ नसतो.
बरं जी माणसं आपल्याला लाईक करतात, त्यांना आपण लाईक करतो का?
जे आपल्याला लाईक करत नाहीत त्यांनी लाईक करावं म्हणून तरी दुःखी कशाला व्हायाचं?
सगळेच आपल्या मार्गाने कसे येतील.
ज्यांना ज्या गावाला जायचे त्या गावाला जातील.
आपल्याला जिथे जायाचं तिथे आपण जायाला पाहिजे.
या रस्त्यावर सोबतीला भेटतातच.
नाही कुणी भेटलं तर आपण आपल्यासोबत राहिलो तरी
प्रवास आनंददायी होतो.
आपण आपल्या सोबत नसू तर
आनंद सोबत येऊ शकत, राहू शकत नाही..
गर्दी जमविण्याच्या नादात दर्दीला वेळ देता येत नाही असे तर होतं नाही ना?
कृत्रिम फुलांच्या प्रेमात पडल्यामुळे ख-या फुलांच्या सुगंधानपासून मुकत तरी नाही ना ? जसं कृत्रिम फुलांकडून सुगंध मिळत नाही तसं स्वार्थी,ढोंगी नकारात्मक विचार, भावना आणि कल्पनेत जगणा-या माणसांकडून प्रेमाची अपेक्षा म्हणजे अग्निकडून थंडाव्याची अपेक्षा करणं होय.
पळत्या पांखरा मागे पळू नये
ज्यांना आपलं अंत:करण कळत नाही त्यांच्यासाठी
स्वत:ला जाळू नये.
बरं  आपण बाह्य जगाच्या मागे लागून
आपल्या अंर्तमनासोबत,स्वत: सोबत
राहायचं विसरून गेलो तर नाही ना?
खरं तर आनंदाचं केंद्र मन, अंर्तमन असते.
मनच ठरवतं असते, कशात आनंद मानायचा अन् कशात नाही.
मन प्रसन्न तर सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.नाहीतर मग कशातच आनंद नाही वाटत.
स्वत:सोबत रममाण होऊ शकतात ती माणसं आनंदी असतात, बाहेर आनंद शोधत फिरणारी माणसं आनंदी नसतात,ती तशी भासवतात.आपलाही तसा भास होतो.
मृगजळामागे लागून खरा आनंद गमावत चाललो आहोत.
भासवण्याचा नाद लागला की,
असणं विसरून जातो आपण.
बरं आपल्या जे जे मिळाले त्यांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करायला कधी वेळ काढलाय का?
कृतज्ञता नसलेली  माणसं आनंद गमावून बसतात.
जे जे मिळाले  त्याविषयी कृतज्ञ राहून आनंद मानला तर आनंद वाटतो.
आनंदी राहून जे काही मिळवायचे ते मिळवत वाटचाल करू लागलो तर आपला प्रवास आनंददायी होईल.
आधी तोंडात घेतलेल्या घासाचा आस्वाद
अन् घ्यायला हवा.ते विसरून आपण  घाईघाईने घास गिळून टाकत आहोत.
भूक  लागलेली नसता  पुन्हा मिळेल की नाही म्हणून पोटात कोंबण चालू आहे, त्यामुळे तृप्तीचा ढेकर येतंच नाही.
अपचणाचा त्रास मात्र होत आहे.
मिळाले त्यात समाधान, कृतज्ञता व्यक्त करीत अजून आवश्यक ते मिळवण्यासाठी नियोजन करून ते मिळवण्यासाठी धडपडायला काही हरकत नाही.
त्याआधी'
'सबका कल्याण होय रे'ही
मंगलमैत्री,
'सर्वे भवन्तु सुखिन:
'सर्वे  संन्तु निरामया:'

'पसायदान, '
वामनराव पै यांनी सांगितलेली' विश्वप्रार्थना'
मानसिक प्रसन्नता देऊ शकते.
माझी माय  रूख्मीणबाई
संध्याकाळी झोपताना सर्व देवांचे स्मरण करून
'देवा सर्वांचं भल कर,मग माझ्या लेकरांचं भलं कर' असं म्हणायची.
आपणही सर्वांच्या कल्याणाची भावना, सकारात्मक विचार आणि प्रार्थना केली तरी दुष्ट भावना त्रास देत नाहीत.शांत झोप लागते.
विपश्यना, योगसाधना,सत्संग,घडले तशी सेवा,सत्संग, विधायक धंद आणि आपल्या विधायक ध्येयावर
लक्ष ठेवून वाटचाल केली तरच कल्याण होईल.
जगात सुख, शांतता आणि आरोग्य नांदेल.

डॉ. हनुमंत भोपाळे
    मोबाईल नंबर:9767704604

 Email:    hanumantbhopale@Gmail.com
ब्लागला भेट देण्यासाठी
https://           drhanumantbhopalesir.blogspot.com
फेसबुकवर
Facebook:      hanumantbhopale

Sunday 29 March 2020

मानसिक स्वच्छता आणि सक्षमतेची खूपच गरज आहे

9767704604
hanumantbhopale@Gmail.com

Saturday 28 March 2020

सावध राहण्याची गरज
    डॉ हनुमंत भोपाळे

कोरोनाचा उदय ज्या देशात झाला त्या देशाची काय अवस्था झाली?आज काय परिस्थिती आहे?
ज्या ज्या देशात कोरोना गेला त्या देशाची आजही परिस्थिती काय आहे? त्यांनी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत? आपण काय करत आहोत याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
     विज्ञानाचा नियम सर्व देशांत सारखाच परिणाम करत असतो.कोरोनाही विषाणूंची लागण झाल्यानंतर सारखेच परिणाम भोगावे लागणार आहेत.कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या सहवासात गेलेल्या व्यक्तीला लागण होत आहे.ऐवढेच नाही तर त्या व्यक्तीने ज्या ज्या वस्तूला स्पर्श केला त्या वस्तूंना स्पर्श केला तरी संसर्ग होतो.
हेच घडत आहे.
ज्या ज्या देशात कोरोना गेला आहे त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
अमेरिका,
इटलीमध्ये शेकडो लोक मरत आहेत.पोलंडची तिचं
परिस्थिती आहे.चीनने भोगू ने ते भोगले आहे.
अपरिमित जिवित आणि वितहानी झालेली आहे.
असे असतानाही आपण अजूनही हा विषय फारशा गांभीर्याने घेताना दिसत नाही आहोत.
 आजूबाजूला काही नाही याचा सगळ आलबेल आहे असे नाही.अनेक संशयित रुग्ण फरार दिसतात.
काहीजणांना लागण झाली असेल पण ते अनामिक भीतीने दवाखान्यात जाऊन काही इलाज नाही त्यापेक्षा
शेतात, माळावर,घरातच मेलेलं बरं अशी गैरसमज करून
फिरत आहेत.शेकडो लोक
तपासणीला गेलेले आहेत, यातूनच रूग्ण सापडत आहेत. खोकला ताप सर्दी झालेली असंख्य माणसं स्वत:च मेडिकलवर ईलाज करून घेत आहेत,यातील अनेकांना कोरोनाची लागण झालेली असू शकते.
हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
सर्वांची घरोघरी जाऊन तपासणी केली तरी शेकडो रूग्ण सापडू शकतात.संख्या खूप अजून वाढू शकेल.ती भयानक असेल.
  लागण झाली की,व्यक्ती मरतोच असे काही नाही.ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे,त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे,तो कदाचित मरणार नाही पण त्याच्यामुळे अनेकांना लागण होऊन ते मरू शकतात ही बाब आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे.आधीच कोणता तरी आजार झालेली माणसं, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुबळ्या व्यक्ती
लहान मुले, वृध्द लोकांना जर लागण झाली तर
ही माणसं मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता आहे.
अजूनही या कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. मूत प्या,शेण खा हे सगळे अज्ञानमूलक उपाययोजना आहेत.ठोस उपाययोजना झाली नाही.
दवाखान्यात गेल्यानं मग काय फायदा ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दवाखान्यात गेल्यानं तुम्हाला खरच हा आजार झाला आहे का हे स्पष्ट होईल.
तुम्हाला अन्टिबायटिक औषधे,इतर काही औषधे,इंजेक्शन, सलाईन लावून तुम्ही मरणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.शरीर साथ देत आहे ते बरे होत आहेत.मरण्याच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने बरे होण्याचे प्रमाण सध्या तरी भारतात दिसून येत आहे ही एक जमेची बाजू आहे.
दवाखान्यात जाण्याचा अजून एक फायदा की, ज्यांना हा आजार झाला आहे यांच्यामुळे इतरांना हा आजार होणारं नाही.
काहीजणांना खोकला,सर्दी झाली आहे, त्यांना वाटत आहे की, आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे,ते जर घाबरून दवाखान्यात गेले नाहीत तर चिंतेने मरू शकतात.असं होऊ द्यायचं नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोना झाला असे समजून चिंता करत बसण्यापेक्षा सरळ
डॉक्टरांकडे गेलेले बरे!
काहीजणांना वाटते,तिथे रूग्ण असतात,त्यांचा ससंर्ग आपल्या होईल.
असे काही होत नाही.नाका तोंडाला रूमाल बांधून जा.
नाकातोंडाला हात लावू नका.
घरी आल्यावर स्वच्छआंघोळ करून घ्या. कधीही नाकातोंडाला हात लावू नका. सर्व कपडे गरम पाण्यात भिजवून धूवून टाका. बाहेरच्या व्यक्तीचा संपर्क टाळा.संपर्कात जाणं गरजेचं असेल तर नाकातोंडाला रूमाल बांधा.
परत घरी आल्यावर आंघोळ करून घ्या.
कोणत्याही पदार्थ, वस्तूला हात लावल्यावर साबण,डेटालने हात स्वच्छ धुवून घ्या.
शक्य तोवर बाहेर ये जा करत असलेल्या माणसाच्या संपर्कात येताना तुमच्या नाकातोंडाला रूमाल बांधणे,त्याला स्पर्श न करणे हे चांगले प्रतिबंधात्मक उपाय ठरतात.
सावध रहा, अंतरावर रहा,स्वच्छता बाळगा

डॉ. हनुमंत भोपाळे 9767704604
hanumantbhopale@gmail.com
कार्य करणारे आणि कार्याची नोंद घेणारी माणसं खरंच मोठी असतात
डॉ.हनुमंत भोपाळे
                 हजारो हात कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रयत्नशील आहेत.
त्या सर्वांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे.
राजकारणी माणसंही किती कष्ट घेतात ,याची जाणीव समाजाला या निमित्ताने होतं आहे.असंख्य माणसं
ऐनकेन प्रकारे आपले योगदान देत आहेत.विविध पक्षांत देखील एकजूट दिसून येते,ही बाब आम्ही कठीण समयी एकजूटीनेच राहतो, बाब  भारतीय राजकारणी माणसांनी दाखवून दिली आहे. सन्मानीय पतंप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले.सन्मानीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,यांनीदेखील त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.मा.शरद पवार साहेब हे सतत लक्ष ठेवून आहेत.मार्गदर्शन आणि जनतेच्या हितासाठी मागण्या करीत आहोत.आम्ही तुमच्या सोबत आहोत असे शासनाला सांगत आहेत.त्यांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचे कौतुक केले आहे.
खरंच मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री टोपे साहेब यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
माननीय नामदार अशोकराव चव्हाण नांदेडमध्ये तळठोकून आहेत.सातत्याने बैठका घेऊन प्रशासनाला मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत.
केंद्र सरकारला विनंती करून जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
खासदार हेमंत पाटील यांनी विदेशात सिंगापूर येथे
अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली आहे. सन्मानीय खासदार आमदार देखील त्यांच्यापरीने काम करीत आहेत.समन्वयाने वागत आहेत.
ही बाब लोकशाही प्रगल्भ झाली याचे दर्शन घडवते तसे राष्ट्रीय ऐक्याचेही दर्शन घडवते.
काम केवळ पैसे दिल्यानेच होतात असे नाही.पैसासोबत प्रेम,प्रोत्साहन दिले,कार्याची दखल घेतली.आम्ही तुमच्या सोबत आहोत,याची जाणीव करून दिली तर काम करणाऱ्या माणसाला हत्तीचं बळ येते.माणसं झपाटून काम करतात.सतत काम करणा-या वरिष्ठांकडून  कौतुक झाले तर अधिक परिणामकारक ठरते. सर्वसामान्य कुटुंब जन्मलेल्या, कार्याच्या बळावर पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतलेल्या
मा. नरेंद्र मोदीं यांनी काल पुण्यातील छाया नर्सला स्वत:फोन करून कोरोनाला हटविण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले.अभिनंदन केले.उत्साह वाढविला.संवादाची सुरूवात मराठी भाषेतून करून भाषेचाही गौरव केला.
काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.पाणी,रक्त जसे तयार करता येतं नाही तसे प्रेम विकत मिळत नाही.
विकत न मिळणारे प्रेम,उत्साहरूपी ऊब मिळाल्याने विलक्षण आनंद होतो.कामाचा शिण दूर जातो अन् कार्याला बळ मिळते.
ही ऊब देण्यासाठी मनाचा मोठेपणा, माणसांविषयी अतीव प्रेम, जिव्हाळा,माया मनात असावी लागते.मा.नरेंद्र मोंदी यांनी केलेल्या ह्या फोनने एका व्यक्तीचे बळ वाढविले नाही, तर तमाम काम करणाऱ्या जनतेचे बळ वाढविले.कामाची कदर होते हा संदेश दिला.
  याचा अर्थ काम करणाऱ्या माणसांनी प्रेम,प्रोत्साहन मिळाले तरच काम करावे असे मात्र नाही.कोत्या मनाची माणसं विधायक कार्याचे कौतुक करू शकत नाहीत.
रत्नपारखी मिळाला नाही म्हणून रत्नांनी आपलं रत्नत्व सोडायचं नसते.झुडपाकडून सावलीची अपेक्षा करायची नसते.
आज असंख्य माणसं माणसांच्या प्रतिमेच्या संपर्कात आलो तर कोरोना होईल म्हणून घाबरत आहेत.अशा
 परिस्थितीत प्रत्यक्ष कोरोना झालेल्या व्यक्तीची सेवा करणारी माणसांचे कार्य आणि धैर्य नोंद घेण्यासारखे आहे.
पोलिस,  डॉक्टर, अत्यावश्यक सेवा देणारी माणसं,कोरोनाची लस शोधून काढण्यासाठी स्वत:ला प्रयोगशाळेत बंदिस्त करून घेतलेले शास्त्रज्ञ, सफाई कर्मचारी, मिडीयात काम करणारी सर्व माणसं, राजकारणात सक्रिय असलेली माणसं,समाज सेवक, साहित्यिक,चित्रकार,गायक, प्रबोधनकार, आर्थिक योगदान सर्व सन्मानीय आदींचे कार्य कौतुकास्पद आहे.
सचिन तेंडूलकर,अमिताभ बच्चन,निता अंबानी-
अक्षयकुमार-सलमानखान-एम.एस.धोनी-अमीरखान-करोड.टायगर श्राफ-  रोहीत शर्मा- करोड.संजय दत्त-...ऋतिक रोशन-  रजनीकांत  आदी मान्यवर मंडळी दिलेले  आर्थिक योगदान नोंद घेण्यासारखे आहे.
अझीम प्रेमजींनी तब्बल 52,750 कोटींची मदत दिली आहे.
 भारतीय रेल्वेच्या अनुसूचितजाती जमाती कर्मचारी संघटनेने सत्तर कोटीची मदत केली आहे.सन्मानीय खासदार,आमदार,प्राध्यापक , अनेक क्षेत्रांत काम करणारे अधिकारी एक दिवसाचा पगार देणार आहेत.नागरिकदेखील मदतीसाठी समोर आले आहेत.
सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
डॉ.हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com
अमेरिका गाफिल राहिल्याने असे घडले
       डॉ हनुमंत भोपाळे
चीन-अमेरिका अंतर 11,640 km आहे.हे अंतर खूप दूर असल्याने कोरोना
व्हायरसची लागण होणार नाही, असा गाफिल आत्मविश्वास नडला असल्याची चर्चा आहे.
विदेशी विमान वाहतूक चालू होती.
यामुळे ह्या आजाराचा प्रसार झाला.तो लवकर लक्षात आला नाही.
आता सर्वांधिक गतीने अमेरिकेत करोना व्हायरसच्या संसर्गाची माहिती समोर येत आहे.
आज अमेरीकेत कोरोनाबाधिताची संख्या 80 हजार तर
मृतांची संख्या जवळपास 1हजार
असल्याची माहिती माननीय प्रभाकर मुधोळकर अण्णांनी दिली आहे.ते सध्या अमेरिकेत आहेत.
जागतिक महासत्ता असलेली अमेरिका कोरोनामुळे
हवालदिल झाली आहे.
इटालीलाही प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
 तैवान, सिंगापूर आदी देशांनी तातडीने उपाययोजना केली.त्यांनी तीन दिवसांत विमान प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सुरू केली.
यांच्या तुलनेत भारताने उशीर केला आहे.
तरीपण २१ दिवसाची संचारबंदी बंदीचे पाऊल महत्त्वपूर्ण असून हा कालावधी वाढवावा लागेल असे चिन्ह दिसून येत आहे.
सरकार तीन महिन्याची तयारी करीत आहे.
ही बाब बरेच काही सूचित करीत आहे.
अमेरिका,इटली सारखी आपली परिस्थिती झाली तरी त्यांच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक हानी होणार आहे.
वाढता प्रसार लक्षात घेऊन लुटमार होईल म्हणून अमेरिकेत शस्रखरेदी काहीजणांनी सुरू केल्याचे वृत्त धक्कादायक आणि धोकादायक आहे.भारताने यासंदर्भातही जागरूक राहण्याची गरज आहे.
भारताला अज्ञान, अंधश्रद्धेचाही मोठा धोका आहे.
देवीचा कोप म्हणून काही ठिकाणी देवीला नैवेद्य, आंघोळ घालण्यासाठी जात असल्याचे वृत्त आहे.
मला काही होत नाही हे अज्ञान फार मोठा धोका निर्माण करणार आहे.

डॉ .हनुमंत भोपाळे
आतील गर्दी कशी टाळायची ?
       डॉ. हनुमंत भोपाळे
बाहेरच्या गर्दीपासून अंतर ठेवता येईल पण काहीजणांच्या घरात वीस पंचवीस सदस्य असतील तर त्यांनी कसं अन् काय अंतर ठेवायचं ? असा काही ठिकाणी प्रश्र्न निर्माण झालाय.अशा ठिकाणी एकाला जरी कोरोनाची बाधा झाली तर अख्खे कुटुंब संपुष्टात येऊ शकते.
इस्लामपुरात काय घडले आहे ते डोळे उघडे ठेवून पाहायले तर डोळे उघडतील.
जवळचे माणसं या काळातही काही विचार न करता गळाभेट, मिठ्ठी, बैठका, पार्ट्या करत राहिले स्वत: बरोबर
आजूबाजूच्यानाही हे  कायमचे सोबत घेऊन जातील.
    काही कुटुंबांमध्ये सुट्टीमुळे वेगवेगळ्या ठिकाण वेगवेगळ्या कारणांनी  विखुरलेले कुटुंबातील सदस्य, नातेवाईक एकत्रित आले आहेत.कोण कोणाच्या संपर्कातून,स्पर्शातून आला हे कुणीही सांगू शकत नाही.
  काहीजण वेळ कसा घालवायचा म्हणून एकत्रित येत आहेत.
काहीजण पार्टी करायची म्हणून जमा होत आहेत.काहीजण वाढदिवसानिमित्त एकत्र येत आहेत.
काहीजणांनी भंडारे सुरू केले आहेत.
  एकेकाळी जनप्रिय झालेली रामायण आणि महाभारत
मालिका  शासनाने सुरू केली आहे.या मालिकेच्या निमित्ताने आता अनेकजण एकत्र येतील.काहीजणांकडे दूरदर्शनची सोय नसल्याने ज्यांच्याकडे ही सोय आहे तिथे जमतील.तिथे सुरक्षित अंतर राखू शकतील असे वाटत नाही.
काही बोललं तर वैर नको,रोष नको म्हणून कोरोनाचा रोष ओढवून घेतली असे वाटते.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अंतर्गत दक्षता आणि सुरक्षितताही महत्त्वाची आहे.यासाठी कुणी पोलिस येणार नाही.बाहेर रस्त्यावर गर्दी होऊ नये, सुरक्षितता राखली जावी म्हणून प्रशासन आहे.अंतर्गत सुरक्षिततेसाठी प्रशासन काय करेल!
शेवटी हेही माणसं आहेत, कंटाळून मरून जाऊ दे म्हणून शांत बसू शकतात, असे झाले तरी कायमची शांतता निर्माण होऊ शकते.
  हे संकट माणसांनी मनात घेतले तरच परतवून लावू शकतील. कोरोना हा हदेवी अन् देवाच्या तर शक्तीच्या पलिकडचा विषय झाला आहे.याचा जग अनुभव घेत आहे.
तरी  सवय जात नाही.एका गावात एका स्त्रीच्या अंगात देवी आली म्हणे!त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे पोचम्मामायीला पाणी आणि नवैद्य दाखविण्यासाठी गर्दी झाली.
सध्या सोशल मीडियावर एक क्लिप फिरत आहे,प्रत्यक्ष सेवेत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले, "लोक ऐकायला तयार नाहीत. असेच घडत गेले तर भारताची अवस्था इटलीपेक्षा भयानक होईल."
खरं आहे,प्रत्येक जिल्ह्यात तपासण्या होत नाहीत.अनेकजण मला काही झाले नाही म्हणून मेडिकलवर जाऊन सध्या गोळ्या औषधी घेत आहेत.
काहीजण मांत्रिकांकडून उपचार घेत आहेत.
अज्ञान,बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि अज्ञानामुळे अधिकच्या धोकादायक परिस्थितीला देश समोर जाईल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.मरण आल्यावर चुकते काय रं असे म्हणत आहेत.सटवीने लिहून ठेवले तेव्हाच मृत्यू येतो,वरची दोरी तुटल्यावर कुणी रोखू शकत नाही.आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चालेना असेही बेजबाबदारपणे बोलत आहेत.तसं वागत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी काहीजण अजिबात काळजी घेत नाहीत असे निदर्शनास येत आहे.
हा धोका ओळखून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली तरच
या संकटावर मात करता येईल अन्यथा संकटानी आपल्यावर मात केली तर मग काही खरं नाही, यासाठी
सर्वांनी मिळून ही परिस्थिती टाळण्यासाठी कटिबद्ध होणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
डॉ.हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com
हाताला काम देणं शक्य नसेल तर
कामगारांना शहरात बळजबरीने ठेवून घेता येईल का?
         डॉ हनुमंत भोपाळे
हाताला काम देणं शक्य नसेल तर
कामगारांना शहरात बळजबरीने ठेवून घेता येईल का?असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उष्णता वाढत असताना
चोहोबाजूंनी पत्रे असलेल्या रूममध्ये दिवसभर राहणे  विलक्षण वेदनादायी ठरणार आहे.ही बाब लक्षात घेऊन गावाकडे काही दिवस झाडाखाली थंड बसून तरी राहता येईल. गावात गेललो तर कमी खर्चात उदरनिर्वाह होईल.उधारी,उसणपासणं मिळेल.
याशिवाय शिधापत्रिका गावात आहे,थोडी शेती नावावर असणा-यांना एप्रिल मध्ये दोन हजार रूपये मिळणार आहेत,गोरगरिब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप, उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस, स्वस्त धान्य दुकानात  मोफत,रास्त भावाने अन्नपुरवठा याचा लाभ गावाकडे मिळेल .शिक्षापत्रिकेवर नाव गावात असते.अनेक कामगारांना शहरात ही सुविधा मिळालेली नसते.
किराया,लाईटबिलचा प्रश्र्न गावात नाही.
शेतातील कामे बंद नसल्याने शेतात मजुरी मिळेल,आपल्या थोड्याशा शेतीची मशागत करून घेता येईल यामुळे अनेक जण आपापल्या गावाकडे जात आहेत.
एकवीस दिवसांत हे प्रकरण मिटणार नाही असे वाटत आहे.तोपर्यंत काम बंद असताना रूमचा किराया कसा द्यायचा?काय खायचे?ह्या सतावणा-या प्रश्नांमुळे
गावाकडे जाण्याचा अनेक कामगारांनी निर्णय घेत आहेत. काहीजणांना वाटत आहे,समजा आजार झाला तर हाडं तरी गावात पडतील.अशी भावना निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत अन् मनःस्थिती असलेल्या , अडचणीत सापडलेल्या कामगारांना
बळजबरीने जेवायला देतो म्हणून थांबणे शक्य नाही.
अशा परिस्थितीत शासनाने यांची तपासणी करून
त्यांना गावी सोडणं हा चांगला मार्ग ठरेल.
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

Saturday 21 March 2020

जिवाभावाची माणस जोडून श्रीमंत होता येते -डॉ. हनुमंत भोपाळे

मैत्री भाव जितका ह्रदयात असतो तितक्या प्रमाणात आपल्या जीवनात नकारात्मक भावना आणि विचार दूर ठेवणं शक्य होते.
 राग, द्वेष, मत्सर, निर्माण करत गेलो की, मनानं सोबत राहणारी माणसं भेटत नाहीत . माणसं जवळ आली, सोबत राहिली नाही, सहकार्य केली नाहीत तर श्रीमंत होता येतं नाहीत.
व्यवहाराचा भाग म्हणून  नाईलाजाने काही माणसं जवळ दिसतात. नाईलाजाने सोबत असलेली माणसं इलाजासाठी, आणीबाणीच्या प्रसंगी कामी येतीलच ,असे सांगता येत नाही.
कठिण परिस्थितीत सोबत राहणारी माणसं ही आपली जमेची बाजू असते. आपलेपणा ठेवून वागतात , सहकार्य करतात. विश्र्वास ठेवतात,प्रेम,प्रेरणा, प्रोत्साहन देतात,ती माणसं आपली असतात.आपल्या वागण्याबोलण्यातून
 आपलेपणा व्यक्त होत राहिला तर माणसं जोडायला मदत होते. 
माणसं आपल्या स्वार्थासाठीच जवळ करायची नसतात,त्यांच्याही भल्यासाठी आपण माणसं जोडली पाहिजे.
त्यांनाही घडविण्यासाठी आपण योगदान देता आले पाहिजे.एखाद्या माणसाचं मोठेपण त्या माणसाने किती माणसं मोठी केली यावरून मोजली जातात. आपुलकीचे जिव्हाळ्याचे माणसं म्हणजे आपली भावनिक श्रीमंती वाढण्यास मदत करतात.
आर्थिक श्रीमंती, भावनिक श्रीमंती वाढण्यास माणसं खूप मोठी मदत करतात.प्रेमळ माणसांकडून प्रेम, जिव्हाळा मिळतो.  ही माणसं द्वेषीरूपी झळांचा त्रास होऊ देत नाहीत.
 आपल्याला ऊन लागू नये म्हणून जी माणसं स्वतः उन्हात तापून आपल्याला सावली देतात,अशी सावली देणारी माणसं माऊली असतात.
सावली देणा-या आपल्या माऊलीमुळे मवाली लोकांशी  लढताना बळ मिळते. आपलं कुणी तरी आहे,आपण कोणासाठी तरी आहोत अन् आपल्यासाठी कोणीतरी आहे ,ही भावना माणसाला आनंदित करते.आनंदानं जगता येणं फार मोठं यश,फार मोठी उपलब्धी ठरते.
आपली काळजी घेणा-या माणसाच्या मनात आपल्याविषयी आपुलकी, प्रेम, सेवाभाव, जिव्हाळा असतो.अशी माणसं पाहता क्षणीच आपलं मन भरून येते.  ही माणसं आपली असतात .प्रेमाची नातं हेच खरं नातं असतं.दिव्यातलं प्रेम संपले की दिवा प्रकाश देऊ शकत नाही  तसं  प्रेम संपलं ते नातं आनंद देऊ शकत नाही. मग कोरडेपणा कटूता अनुभवत जगावं लागते.काही माणसं काही मिळेल म्हणून जवळ येतात काही मिळालं नाही की, भूमिका बदलतात.विरोधात जातात.नि:स्वार्थपणे सोबत असलेली माणसं आपल्याला समजून घेतात.काही चूकले तरी माफ करुन व्यवहार साफ ठेवतात. अशी माणसं आपले वैभव असते.
मनानं साफ राहून  जगण्यात मनस्वी आनंद नसतो.
 द्वेष करणा-या माणसांच्या सहवासात झाडाखालीही ऊन लागते अन् जिथं प्रेम आणि प्रेरणादायी प्रेमळ माणसं असतात तिथं उन्हही  सावली,चांदणं वाटायला लागतं. उपेक्षा, अपमान आणि दुःखालाही सहज घेण्याची आणि सहन करण्याची क्षमता ही प्रेमात आहे.
प्रेमळ माणसं सोबत आहेत, मी प्रेम भावनेत आहे.
ही भावना बळ देते.पदराआड लपवून माय लेकराला घास भरवते तसं जगाची दृष्ट लागू नये म्हणून जगाला कळू न देता प्रेम देणारी ही माणसं आपल्याला जपतात. ती आपल्याला अनेकदा कळत नाहीत.
वरवरच्या, नाटकीप्रेमाला भुलल्या माणसांना खरे प्रेम करणारी माणसं कळत नाहीत.  कृत्रिम फुलांना खरी फुलं  मानून जगणा-या  माणसांच्या डोळ्याचे पारणे  फिटतील पण प्रेमाच्या सुंगधाचा आनंद त्यांना मिळत नाही.कृत्रिम फुलांना  रंग असतो पण सुगंध नसतो. सुगंध मनाला प्रसन्न करत असतो.
जसं  हाड फोडताना कुत्र्यांना  त्याच्याच तोंडातून निघणारं  रक्त हाडातलं रक्त आहे,असे वाटते तसं  कृत्रिम रंगाला खरा रंग समजून जगणा-या माणसाची फसवणूक होते. सोय व्हावी, गैरसोय होऊ नये, विनाकारण पंगा घेऊन दंगा आणि दगा बसू नये म्हणून  पोटात काही  वेगळेच असलं तरी ओठावर प्रेम राहिलं  याची  काही माणसं जाणीवपूर्वक काळजी घेतात, अशी माणसं त्यांच्या स्वत:च्या जीवनातील अडचणीं आणि अडथळ्यांना दूर ठेवण्यात ब-याच प्रमाणात यशस्वी होतात. ही माणसं खरं बोलत नाही बरं बोलतात. पुढच्या नुकसान होत असेल, तो चुकीच्या दिशेने जात असेल तरी  ही माणसं मार्गदर्शन करणार नाहीत.हो ला हो करीत राहतात. मार्गदर्शन करल्याने अहंकारी व्यक्तीचि  अहंकार (इगो) दुखावला जाण्याची दाट शक्यता असते. इगो दुखवला की,ही माणसं इंगळी आणि इंगळ (अग्नी) होतात. मग गरळ ओकत राहतात.
        खरे तर प्रेम हे  सत्य बोलून सत्यानाशापासून वाजवत असते. आई, विस्तवाकडे जाणा-या, जवळ गेलेल्या बाळाला झटकन बाजूला काढते, हे करताना हात दुखावेल,कोणी नाव ठेवले, याची ती  तमा बाळगत नाही. प्रेम आपलं हित बघत नाही पुढच्याच हित पाहते, त्यामुळे व्यवहारी माणसाच्या नजरेत प्रेम आंधळं ठरते. अंहकार न दुखवता प्रेम व्यक्त करण्याची कला साध्य करता आली पाहिजे. मार्ग दाखवतानाही पुढच्या मान राखता आला पाहिजे.
   एकदा चार जण  फोर व्हीलर मध्ये प्रवास करीत होते. जायचे त्या गावाला ती गाडी जात नव्हती. नेली जातच नव्हती तर ती कशी जाईल? गाडीचा चालक हा गाडीचा मालक होता. त्या मालकाला कितीही नुकसान झाले तरी चालेल पण  बरं बोलणारी माणसं आवडतच नव्हती . खरं  बोललेलं त्याला खपतच नव्हते. खरं बोलण्याची सवय असलेला  असलेला एक जण  म्हणाला, "हा रस्ता नाही   ,आपण भलत्याच रस्ताने जात आहोत"
. बरं बोललं तरच आपलं बरं होणार आहे ही भावना बाळगून जगणारे तेव्हा म्हणाले, 'मालक चुकतच नाहीत.शक्यच नाही. हे ऐकून  मालकाला अधिक आनंद झाला. मालकांनी पुन्हा गती वाढवली. चुकीच्या दिशेने जाणारी गती लवकर अधोगतीला नेते.  याची जाणीव त्यांना नव्हती.खोट्याच्या प्रेमात पडलेली माणसं ख-या प्रेमाला बाजूला करतात, याची जाणीव ठेवून   समन्वयवादी शांत बसला होता  पण त्यालाही  सहन होत नव्हते. हळूच लघवीचे निमित्त करून तो उतरलो. सर, यापुढे हे अमुकअमूक गाव आहे, असे मला त्या झाडाखाली बसलेल्या माणसांने सांगितले आहे. आपल्याला ह्या गावावरून जावं लागते का? आता मात्र मालकाच्या लक्षात आले. पण मालकाला चूक मान्य करायची सवयच नव्हती. नुकसान झाले तरी चालेल, अशी त्यांची धारणा होती. "मला ते सगळं माहित आहे, आपल्या इथं ऐकाला भेटून जायाचं  असल्याने  इकडे आलो" असे मालक म्हणाला. पुढचं गाव येताच सोबतच्याना संग न नेता जाऊन तो मालक गावात जाऊन आला.मालक येताच ,खरं बोलणारा म्हणाला, कोणाला भेटलात मालक  .मालक खोटंच म्हणाला, " शिंदेला भेटलो, या गावचा मोठा माणूस."
" मालक हे गाव माझं आजोळ आहे. मी लहानपणापासून येतो. या गावात शिंदे कुणीच नाही. सगळे ठक्कर आहेत."-
तेव्हा तो मालकज् म्हणाला," मी  ठक्करलाच प्रेमानं शिंदे म्हणतो. आता आपण हा विषय थांबू या, नाही तर गाडीत बसू देणार नाही असं मालक   रागाने  म्हणाला. अहंकार नेहमी प्रेमाचा, सत्याचा पराभव करत असते, त्यामुळे ते एकटे आणि पश्चातापात जगते. ज्याचा पराभव होतो त्यांच्या सोबत स्वार्थी माणसं नसतात.असल्याचे नाटक करतात. नाटकी माणसं प्रेम देऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकांनी शोध घेतला पाहिजे. खरंच   मनापासून प्रेम करणारी माणसं किती आहेत ? रात्रीबेरात्री ,संकटात धावून येणारी माणसं किती आहेत ? पंच प्राण हे माझे घे
जीवदान तू त्याला दे
 असा त्याग करणारी माणसं किती आहेत? जगाचा कायमचा  निरोप घेताना माझी सावली गेली, आधार गेला. सच्चा मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक गेला म्हणून  उणीव भासून आसू ढाळणारे किती आहेत. जी आहेत ती कुठे आहेत?
याचा शोध घेण्यासाठी थोडा वेळ देता आला, काही चुकले असेल ,आता काही चुकत असेल तर चुक दुरुस्त करून चार प्रेमाची माणसं जोपासता आणि जपता येतील तर बरं होईल!
डॉ. हनुमंत भोपाळे 9767704604
hanumanthopale@gamil.com