Saturday 28 March 2020

अमेरिका गाफिल राहिल्याने असे घडले
       डॉ हनुमंत भोपाळे
चीन-अमेरिका अंतर 11,640 km आहे.हे अंतर खूप दूर असल्याने कोरोना
व्हायरसची लागण होणार नाही, असा गाफिल आत्मविश्वास नडला असल्याची चर्चा आहे.
विदेशी विमान वाहतूक चालू होती.
यामुळे ह्या आजाराचा प्रसार झाला.तो लवकर लक्षात आला नाही.
आता सर्वांधिक गतीने अमेरिकेत करोना व्हायरसच्या संसर्गाची माहिती समोर येत आहे.
आज अमेरीकेत कोरोनाबाधिताची संख्या 80 हजार तर
मृतांची संख्या जवळपास 1हजार
असल्याची माहिती माननीय प्रभाकर मुधोळकर अण्णांनी दिली आहे.ते सध्या अमेरिकेत आहेत.
जागतिक महासत्ता असलेली अमेरिका कोरोनामुळे
हवालदिल झाली आहे.
इटालीलाही प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
 तैवान, सिंगापूर आदी देशांनी तातडीने उपाययोजना केली.त्यांनी तीन दिवसांत विमान प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सुरू केली.
यांच्या तुलनेत भारताने उशीर केला आहे.
तरीपण २१ दिवसाची संचारबंदी बंदीचे पाऊल महत्त्वपूर्ण असून हा कालावधी वाढवावा लागेल असे चिन्ह दिसून येत आहे.
सरकार तीन महिन्याची तयारी करीत आहे.
ही बाब बरेच काही सूचित करीत आहे.
अमेरिका,इटली सारखी आपली परिस्थिती झाली तरी त्यांच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक हानी होणार आहे.
वाढता प्रसार लक्षात घेऊन लुटमार होईल म्हणून अमेरिकेत शस्रखरेदी काहीजणांनी सुरू केल्याचे वृत्त धक्कादायक आणि धोकादायक आहे.भारताने यासंदर्भातही जागरूक राहण्याची गरज आहे.
भारताला अज्ञान, अंधश्रद्धेचाही मोठा धोका आहे.
देवीचा कोप म्हणून काही ठिकाणी देवीला नैवेद्य, आंघोळ घालण्यासाठी जात असल्याचे वृत्त आहे.
मला काही होत नाही हे अज्ञान फार मोठा धोका निर्माण करणार आहे.

डॉ .हनुमंत भोपाळे

No comments:

Post a Comment