Saturday 28 March 2020

सावध राहण्याची गरज
    डॉ हनुमंत भोपाळे

कोरोनाचा उदय ज्या देशात झाला त्या देशाची काय अवस्था झाली?आज काय परिस्थिती आहे?
ज्या ज्या देशात कोरोना गेला त्या देशाची आजही परिस्थिती काय आहे? त्यांनी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत? आपण काय करत आहोत याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
     विज्ञानाचा नियम सर्व देशांत सारखाच परिणाम करत असतो.कोरोनाही विषाणूंची लागण झाल्यानंतर सारखेच परिणाम भोगावे लागणार आहेत.कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या सहवासात गेलेल्या व्यक्तीला लागण होत आहे.ऐवढेच नाही तर त्या व्यक्तीने ज्या ज्या वस्तूला स्पर्श केला त्या वस्तूंना स्पर्श केला तरी संसर्ग होतो.
हेच घडत आहे.
ज्या ज्या देशात कोरोना गेला आहे त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
अमेरिका,
इटलीमध्ये शेकडो लोक मरत आहेत.पोलंडची तिचं
परिस्थिती आहे.चीनने भोगू ने ते भोगले आहे.
अपरिमित जिवित आणि वितहानी झालेली आहे.
असे असतानाही आपण अजूनही हा विषय फारशा गांभीर्याने घेताना दिसत नाही आहोत.
 आजूबाजूला काही नाही याचा सगळ आलबेल आहे असे नाही.अनेक संशयित रुग्ण फरार दिसतात.
काहीजणांना लागण झाली असेल पण ते अनामिक भीतीने दवाखान्यात जाऊन काही इलाज नाही त्यापेक्षा
शेतात, माळावर,घरातच मेलेलं बरं अशी गैरसमज करून
फिरत आहेत.शेकडो लोक
तपासणीला गेलेले आहेत, यातूनच रूग्ण सापडत आहेत. खोकला ताप सर्दी झालेली असंख्य माणसं स्वत:च मेडिकलवर ईलाज करून घेत आहेत,यातील अनेकांना कोरोनाची लागण झालेली असू शकते.
हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
सर्वांची घरोघरी जाऊन तपासणी केली तरी शेकडो रूग्ण सापडू शकतात.संख्या खूप अजून वाढू शकेल.ती भयानक असेल.
  लागण झाली की,व्यक्ती मरतोच असे काही नाही.ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे,त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे,तो कदाचित मरणार नाही पण त्याच्यामुळे अनेकांना लागण होऊन ते मरू शकतात ही बाब आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे.आधीच कोणता तरी आजार झालेली माणसं, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुबळ्या व्यक्ती
लहान मुले, वृध्द लोकांना जर लागण झाली तर
ही माणसं मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता आहे.
अजूनही या कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. मूत प्या,शेण खा हे सगळे अज्ञानमूलक उपाययोजना आहेत.ठोस उपाययोजना झाली नाही.
दवाखान्यात गेल्यानं मग काय फायदा ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दवाखान्यात गेल्यानं तुम्हाला खरच हा आजार झाला आहे का हे स्पष्ट होईल.
तुम्हाला अन्टिबायटिक औषधे,इतर काही औषधे,इंजेक्शन, सलाईन लावून तुम्ही मरणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.शरीर साथ देत आहे ते बरे होत आहेत.मरण्याच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने बरे होण्याचे प्रमाण सध्या तरी भारतात दिसून येत आहे ही एक जमेची बाजू आहे.
दवाखान्यात जाण्याचा अजून एक फायदा की, ज्यांना हा आजार झाला आहे यांच्यामुळे इतरांना हा आजार होणारं नाही.
काहीजणांना खोकला,सर्दी झाली आहे, त्यांना वाटत आहे की, आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे,ते जर घाबरून दवाखान्यात गेले नाहीत तर चिंतेने मरू शकतात.असं होऊ द्यायचं नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोना झाला असे समजून चिंता करत बसण्यापेक्षा सरळ
डॉक्टरांकडे गेलेले बरे!
काहीजणांना वाटते,तिथे रूग्ण असतात,त्यांचा ससंर्ग आपल्या होईल.
असे काही होत नाही.नाका तोंडाला रूमाल बांधून जा.
नाकातोंडाला हात लावू नका.
घरी आल्यावर स्वच्छआंघोळ करून घ्या. कधीही नाकातोंडाला हात लावू नका. सर्व कपडे गरम पाण्यात भिजवून धूवून टाका. बाहेरच्या व्यक्तीचा संपर्क टाळा.संपर्कात जाणं गरजेचं असेल तर नाकातोंडाला रूमाल बांधा.
परत घरी आल्यावर आंघोळ करून घ्या.
कोणत्याही पदार्थ, वस्तूला हात लावल्यावर साबण,डेटालने हात स्वच्छ धुवून घ्या.
शक्य तोवर बाहेर ये जा करत असलेल्या माणसाच्या संपर्कात येताना तुमच्या नाकातोंडाला रूमाल बांधणे,त्याला स्पर्श न करणे हे चांगले प्रतिबंधात्मक उपाय ठरतात.
सावध रहा, अंतरावर रहा,स्वच्छता बाळगा

डॉ. हनुमंत भोपाळे 9767704604
hanumantbhopale@gmail.com

No comments:

Post a Comment