Saturday 28 March 2020

आतील गर्दी कशी टाळायची ?
       डॉ. हनुमंत भोपाळे
बाहेरच्या गर्दीपासून अंतर ठेवता येईल पण काहीजणांच्या घरात वीस पंचवीस सदस्य असतील तर त्यांनी कसं अन् काय अंतर ठेवायचं ? असा काही ठिकाणी प्रश्र्न निर्माण झालाय.अशा ठिकाणी एकाला जरी कोरोनाची बाधा झाली तर अख्खे कुटुंब संपुष्टात येऊ शकते.
इस्लामपुरात काय घडले आहे ते डोळे उघडे ठेवून पाहायले तर डोळे उघडतील.
जवळचे माणसं या काळातही काही विचार न करता गळाभेट, मिठ्ठी, बैठका, पार्ट्या करत राहिले स्वत: बरोबर
आजूबाजूच्यानाही हे  कायमचे सोबत घेऊन जातील.
    काही कुटुंबांमध्ये सुट्टीमुळे वेगवेगळ्या ठिकाण वेगवेगळ्या कारणांनी  विखुरलेले कुटुंबातील सदस्य, नातेवाईक एकत्रित आले आहेत.कोण कोणाच्या संपर्कातून,स्पर्शातून आला हे कुणीही सांगू शकत नाही.
  काहीजण वेळ कसा घालवायचा म्हणून एकत्रित येत आहेत.
काहीजण पार्टी करायची म्हणून जमा होत आहेत.काहीजण वाढदिवसानिमित्त एकत्र येत आहेत.
काहीजणांनी भंडारे सुरू केले आहेत.
  एकेकाळी जनप्रिय झालेली रामायण आणि महाभारत
मालिका  शासनाने सुरू केली आहे.या मालिकेच्या निमित्ताने आता अनेकजण एकत्र येतील.काहीजणांकडे दूरदर्शनची सोय नसल्याने ज्यांच्याकडे ही सोय आहे तिथे जमतील.तिथे सुरक्षित अंतर राखू शकतील असे वाटत नाही.
काही बोललं तर वैर नको,रोष नको म्हणून कोरोनाचा रोष ओढवून घेतली असे वाटते.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अंतर्गत दक्षता आणि सुरक्षितताही महत्त्वाची आहे.यासाठी कुणी पोलिस येणार नाही.बाहेर रस्त्यावर गर्दी होऊ नये, सुरक्षितता राखली जावी म्हणून प्रशासन आहे.अंतर्गत सुरक्षिततेसाठी प्रशासन काय करेल!
शेवटी हेही माणसं आहेत, कंटाळून मरून जाऊ दे म्हणून शांत बसू शकतात, असे झाले तरी कायमची शांतता निर्माण होऊ शकते.
  हे संकट माणसांनी मनात घेतले तरच परतवून लावू शकतील. कोरोना हा हदेवी अन् देवाच्या तर शक्तीच्या पलिकडचा विषय झाला आहे.याचा जग अनुभव घेत आहे.
तरी  सवय जात नाही.एका गावात एका स्त्रीच्या अंगात देवी आली म्हणे!त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे पोचम्मामायीला पाणी आणि नवैद्य दाखविण्यासाठी गर्दी झाली.
सध्या सोशल मीडियावर एक क्लिप फिरत आहे,प्रत्यक्ष सेवेत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले, "लोक ऐकायला तयार नाहीत. असेच घडत गेले तर भारताची अवस्था इटलीपेक्षा भयानक होईल."
खरं आहे,प्रत्येक जिल्ह्यात तपासण्या होत नाहीत.अनेकजण मला काही झाले नाही म्हणून मेडिकलवर जाऊन सध्या गोळ्या औषधी घेत आहेत.
काहीजण मांत्रिकांकडून उपचार घेत आहेत.
अज्ञान,बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि अज्ञानामुळे अधिकच्या धोकादायक परिस्थितीला देश समोर जाईल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.मरण आल्यावर चुकते काय रं असे म्हणत आहेत.सटवीने लिहून ठेवले तेव्हाच मृत्यू येतो,वरची दोरी तुटल्यावर कुणी रोखू शकत नाही.आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चालेना असेही बेजबाबदारपणे बोलत आहेत.तसं वागत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी काहीजण अजिबात काळजी घेत नाहीत असे निदर्शनास येत आहे.
हा धोका ओळखून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली तरच
या संकटावर मात करता येईल अन्यथा संकटानी आपल्यावर मात केली तर मग काही खरं नाही, यासाठी
सर्वांनी मिळून ही परिस्थिती टाळण्यासाठी कटिबद्ध होणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
डॉ.हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

No comments:

Post a Comment