Sunday 22 December 2019

मनाच्या आंघोळीमुळे मन प्रसन्न होते 
    डॉ. हनुमंत भोपाळे
आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत,त्या गोष्टी जर आवडतं नसतील, आपल्या मनात त्याविषयी राग, तिरस्कार,चीड , खंत असेल तर मन मलीन होतं राहते.मग आयुष्य एक ओझं होऊन बसते.डोक्यावरचं ओझं कुणी उतरवू लागेल पण मनावरचं ओझं कोण उतरवेल? मनांवर ओझं घेऊन वाटचाल करणारी माणसं  दुःखी असल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या लवकर थकतात.मन थकले की,तनही थकून जाते.काही करावं वाटतं नाही.कुठेही मन लागतं नाही.कशातही रस वाटत नाही. याला नैराश्य असं म्हणतात.
मी थकलोय म्हटले तर सहवासातील माणसं विचारतात,'
काहीच केला नाहीस तर मग तू कसा थकलास '?
खायला काळ अन् भुईला भार झाला आहेस, असे बोलून पुन्हा त्या व्यक्तीला थकण्यासाठी इंधन दिले जाते.
मन थकले की, सगळेच थकून जाते,ही बाब लक्षात घेऊन मनाला उभारी दिली नाही, उपाययोजना केली नाही तर,ती व्यक्ती कार्यप्रवण होणं  अवघड असते.
नैराश्य हा एक मानसिक आजार आहे, हे समजून घेतले पाहिजे.
निदान झाले नसेल तर उपाय शक्य होतं नाही.योग्य समुपदेशन करून कारणांचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना केली पाहिजे.
वेगवेगळ्या तऱ्हेचे मनावरील ओझे दूर कसे करता येतील ?ओझं येणार नाही,याची खबरदारी कशी घ्यावी?याची जाण आणि ज्ञान असणं आवश्यक आहे.हे आवश्यक शिक्षण आणि प्रशिक्षण घेतले पाहिजे अन् ते मिळालेही पाहिजे.यामुळे  मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक तयार होतील.
मलाच दुःख का ? एखादं अपयश येणं,एखादी संधी हातातून जाणं, एखाद्याच्या कुचक्या बोलण्याचा वारंवार विचार करत  राहणं आदी कारणांमुळे नैराश्य येते.यातून काहीही विपरीत घडू शकते.मानसिकदृष्टया सक्षम करण्यासाठी , योग्य तो उपचार करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.
शिक्षण संस्थांतून केवळ मार्क घेऊन बाहेर पडणं अपेक्षित नाही. मनानं हरलेले आणि मार्कानं तरलेले विद्यार्थी समाजाला सक्षम करू शकत नाहीत.
मनात सलणारे प्रश्र्न ज्यांना सोडवता येत नाहीत,ती माणसं स्वत:चे व  समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी फारसे सक्षम बनू शकत नाहीत.
      गाडी हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण, शिक्षण घेतले जाते तर मग मनाला हाताळण्याचे विशेष शिक्षण आणि प्रशिक्षण का घेतले जात नाही?असे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे.
   आध्यात्मिक ज्ञान,स़ंतसमुपदेशक महात्मे,योगी,मानसशास्त्रतज्ज्ञ आदींची नितांत गरज आहे.मन कसं काम करते हे सांगणारं
,मानसशास्त्र तन कसं काम करते,हे सांगणारं शरीरशास्त्र
तन आणि मनाला एकत्र आणून मानसिक, शारीरिक स्वास्थ कसं टिकवून ठेवता येईल हे सांगणारं
योगशास्त्र   आदीं शास्त्रांचे अध्ययन केले पाहिजे.कानातलं मळ काढणं जसं आवश्यक असते तसं मनातला मळ काढण्याची नितांत गरज असते..शरीरातील नको ते काढून टाकण्यासाठी शब्दक्रियेची जशी गरज असते तशी मनातील नको त्या भावना, कल्पना आणि विचार काढून टाकण्यासाठी शब्दरूपी शस्त्रक्रियेची नितांत आवश्यकता असते.
तथागत गौतम बुद्ध,  पातंजल ऋषी,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम,स्वामी विवेकानंद,  सत्यनारायण गोयंका,श्री श्री रविशंकर जी, आदी महापुरुषांनी मनासंबंधी मांडलेल्या विचारांचे चिंतन मनन करणे उपकारक ठरते.घर रोज स्वच्छ करतो.शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतो तसं रोज मनाची आंघोळ केली पाहिजे. योगसाधना,विपस्यना,सत्संग, संगीत,शुभसंकल्प, सकारात्मक विचार, भावना आणि कल्पनेने मनाला आंघोळ घालता येते.
या आंघोळीमुळे मन प्रसन्न, आनंदी , उत्साही राहते.सक्षम बनते.मानसिक समाधान,सुख शांती लाभते.
अशा जगण्यात खरी मजा आहे.
डॉ. हनुमंत भोपाळे
9767704604

Friday 13 December 2019

सोपं आणि अवघड यापेक्षा  आवश्यक ते करण्याची गरज
       डॉ.हनुमंत भोपाळे
प्रत्येक माणूस कोणती ना कृती उक्ती करत वाटचाल करतो.  काहीजण कुणी तर करत आहेत,आपण त्यासारखं काही करावं म्हणून करतात.काहीजण आपल्या सहवासातील जे करता त्यांच्याविरोधी, उलट करतात. विरोधाला विरोध एवढाच त्यांचा कार्यक्रम असतो.
काहीजण म्हणतात"मला कुणाचही अन् कशाचं देणंघेणं नाही,मला जे वाटते, जसं वाटते तसं करतो."
काहीजण सोपं काय आहे,ते करतो,अवघड असेल मला जमत नाही.मी करत नाही, असे बोलतात.
अवघड आहे,ते करायचं म्हटलं की, त्यांना घाम फुटतो.
खरं तर  आवड,निवड, सोपं आणि अवघड यासर्व बाबींपेक्षा  आवश्यक, अत्यावश्यक     काय आहे, याचा विचार करून त्या गोष्टी साध्य करायला पाहिजे तरच आपल्याला फायदा होईल.
जे आपल्याला जमतं नाही असं वाटते ती गोष्ट आपण अवघड समजतो.अवघड वाटणारी गोष्ट सोपी करण्यासाठी काय करणे, कसं करणं आवश्यक आहे याचा विचार केला पाहिजे.जी माणसं ह्या अवघड गोष्ट करत आहेत, त्यांचे मार्गदर्शन,तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींचे सहकार्य घेतल्यास फायदा होतो. घेणे.
   क्लास वन अधिकारी पदाच्या मुलाखतीच्या वेळी
मुलाखत घेणा-यांनी विचारले जात होते की, 'तुम्ही ज्या भागात नोकरी करणार आहात,त्या ठिकाणी पाच सहा भाषेत संवाद साधून काम करावं लागणार आहे,ते शक्य आहे का?'
या प्रश्नाला अनेक उमेदवार नाही असे उत्तर देत होते.
एक उमेदवार म्हणाला,"ते शक्य आहे.
कारण मला प्रादेशिक भाषा मराठी, राष्ट्रीयभाषा हिंदी चांगली जमते ‌इंग्रजी भाषाही ब-यापैकी समजते.जे आवश्यक आहे ते मी सतत शिकत आलो आहे.पुढेही शिकेलच. स़ंपर्क,सहवास , मार्गदर्शन आणि अभ्यास यांच्या बळावर मला इतर भाषा लवकर शिकणं शक्य आहे,याची खात्री देतो. एखाद्या वेळी गरज वाटलीच तर दुभाषिक कर्मचाऱ्यांची मदत घेईल."
संवाद साधण्याचा हेतू काम करणे हा आहे तर मी भाषेमुळे कुणाचेही काम अडू देणार नाही.
याचे उत्तर सर्वांना पटले आणि त्याची निवड झाली.
काहीजणांना  जमत नाही असे म्हणण्याची इतकी सवय झाली आहे की,काहीही विचारा त्याचं उत्तर असते
' मला जमत नाही,मला शक्य नाही.मी करत नाही.तुला काय करायचे आहे,मी मरून जाऊ दे. मज कसंही होऊ दे,'
 बेकायदेशीर, अनावश्यक,विषय बाह्य बाबींना नाही म्हणावे लागते . आपल्या क्षेत्रातील  जे करणे आवश्यक त्या बाबींना आपण सतत नकार देत, पाढा वाचत
जगू लागलो तर आपण नालायक, बिनकामाचे ठरतो.बिनकामाची बाब फेकून दिली जाते.तिला बाजूला ठेवले जाते. कधी कधी काही तरी काम द्यायचं म्हणून अशा व्यक्तीला बिन महत्त्वाचे, अनावश्यक काम सांगितले जातात,बिन महत्त्वाचे काम करून कुणीही महत्त्वपूर्ण बनतं नसते.
 सरकारी नोकरीत कसं तरी सहन करतात,पण खाजगी क्षेत्रात जमत नाही म्हटलं की बाहेरचा रस्ता दाखवला जातो. 
         असाध्य ते साध्य/ करिता सायास
          कारण अभ्यास/तुका म्हणे
यावर  श्रद्धा ठेवून आवश्यक ते करत गेलो की, अवघड वाटणारं हळूहळू जमते.काही ना मार्ग निघतो.
जन्मल्या बरोबर कुणी पळत नाही. हळूहळू पळण जमते.एक एक पाऊल योग्य आणि आवश्यक दिशेने टाकत गेलो तर नक्कीच प्रवास होतोच.
कुणी आईच्या पोटातून शिकून येतं नाही.आज आपल्या ज्या गोष्टी जमतात, त्या आपण शिकलो आहोत.आपल्या
कुणी तरी शिकवलं आहे.
मनापासून शिकण्याची इच्छा हवी.ती बाब अत्यंत गरजेची असेल तर नक्कीच ती बाब साध्य होते.
 एक पाऊल टाकून तर पहा मागचा पाय पुढे नेण्यासाठी तयारच आहे 

Attachments area
आत्मबळ खूप महत्त्वाचे आहे
               डॉ हनुमंत भोपाळे
मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी असंख्य माणसांना रात्रंदिवस काबाडकष्ट करावे लागतात.या कष्टाचं अनेकांना काही दुःख वाटतं नाही.ते दिवसभर कष्ट करून गाढ झोपी जातात.अशा अवस्थेत त्यांची तब्येत चांगली राहते.सुखासमाधानाने जगणा-या या माणसांच्या जीवनात जेव्हा आजार,कर्ज,कलह, कोर्ट कचे-या, बेरोजगारी, नापिकीमुळे नुकसान या गोष्टी  येतात तेव्हा ते अत्यंत दुःखी, भयभीत, चिंताग्रस्त होतात.  जगण्यात काही मजा वाटत नाही, जगणं सजा वाटायला लागते.प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकत नाही ,असे वाटत नाही तेव्हा ख-या अर्थाने खच्चीकरण होते. स्वत:च
आपण आपले जितके मानसिक खच्चीकरण करून घेतो तितके खच्चीकरण जगातील कोणतीही शक्ती करीत नाही.
प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी मानसिकशक्ती,आत्मबळ खूप मोलाची मदत करते. हे कसं वाढवायचं हे समजून घेऊन थोडे पथ्य आणि थोडे परिश्रम घेण्याची गरज आहे.क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाचा उपयोग केल्यास निश्चितच जीवनातील दुःख दूर होण्यास मदत होते.
विचार बदल्यास,कृती बदलल्यास जीवनात परिवर्तन घडून येतेच.
 प्रतिकूल परिस्थितीने निराश, उदास झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्याला पहिल्यांदा होय, नक्कीच तू ही परिस्थिती बदलू शकतोस,याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल केलेल्या माणसांच्या चरित्र, आत्मचरित्राचे वाचन केल्यास नक्कीच फायदा होईल.
माझ्याच नशीबाला असं का?या प्रश्नातून मुक्तता होण्यास असे ग्रंथ मदत करतात. कुणी कुणी ,कशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीला हाताळले याचा शोध घेतला पाहिजे. आपणही त्यांनी निवडलेल्या मार्ग आणि पध्दतीचा वापर करून बाहेर येऊ शकतो असे वाटले की, ब-याच प्रमाणात मानसिक ताण दूर होण्यास मदत होते.
 अंधार दूर करण्यासाठी आपण उजेडचं निर्माण करायला पाहिजे, उजेडाची सोय करायला पाहिजे.याशिवाय अंधार
दूर होतं नाही.ज्याच्या अभावामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे ती अनुकूल करण्यासाठी पहिल्यांदा मनोबल वाढविले पाहिजे.आत्मविश्वास, उत्साहाने उणिवा दूर करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले पाहिजेत.
नक्कीच यश मिळते.दगरथ मांझी यांनी माळ कोरून रस्ता तयार केला.त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन एक चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.बाबुराव केंद्र  यांच्या कार्यावर आधारित पाणी हा चित्रपट तयार झाला आहे. केवळ चित्रपट बघावेत म्हणून हे सांगत नाही तर सतत योग्य ते काम करून जीवन सुखी करण्यासाठी सिध्द झाले तर नक्कीच फायदा होते असे सूचित करायचे आहे. झपाटून काम केले चित्रपट निघणार नसला तरी आपली विचित्र झालेली परिस्थिती नक्कीच बदलू शकते.
कुणी तरी येईल आणि आपले दुःख, दारिद्र्य दूर करील
म्हणून वाट पाहण्यापेक्षा आपणच वाटचाल केली की, जीवन यशस्वी होते. 
एकजण, पायाला चप्पल नाही म्हणून रडत होता.बाजूला पाहतो तर एका व्यक्तीला दोन्ही पाय नसतानाही तो आनंदाने हसत होता.
रडणाऱ्या व्यक्तीने विचार केला, पहिल्यांदा हसत जगायला शिकू.
रडल्याने नाही तर लढल्याने, परिश्रम घेतल्याने विजय मिळतात.
चप्पल घ्यायला पैसे लागतात.हसायला अजून तरी पैसे मोजावे लागत नाहीत.
चप्पलसाठी लागणारे पैसे रडल्याने मिळणार नाहीत.काम केल्यानं मिळतात.काम केले की,दाम मिळतेच,असा विचार करून वाटचाल करणे निश्चितच फायदेशीर ठरते,असा करून त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि तो श्रीमंत झाला.
डॉ.हनुमंत भोपाळे
९७६७७०४६०४

मोठं होण्यासाठी एकचं क्षेत्र नसते
     डॉ. हनुमंत भोपाळे
            काहीजण एखाद्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तिथे त्यांचा जम बसतो.ते यशस्वी होतात पण अनेक यशस्वी समजलेल्या माणसांना सुरूवातीच्या क्षेत्रात फारस काही करता आले नाही.त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली, यशस्वी झाले. त्यासाठी रस्ते बदलावे लागेल तरी हरकत नाही प्रवास थांबणार नाही असा विचार करून वाटचाल करणे आवश्यक असते.
महात्मा गांधी यांनी वकिली केली.पण ते यशस्वी वकील होऊ शकले नाहीत.पण त्यांनी राजकारणात  आपला अमीट असा ठसा उमटविला.त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र,त्यांचे लेखन जगप्रसिद्ध झाले.
       काहीजण एका विशिष्ट क्षेत्रात जावं म्हणून त्या क्षेत्रासंबंधी पदवी घेतात.पण त्यांना मध्येच वाटते की, नाही आपण दुसऱ्या क्षेत्रात गेलं पाहिजे .त्या क्षेत्रात आपण चांगले काम करू शकतो, एवढेच नाही तर आनंदाने जगू शकतो म्हणून जातात.तिथे चांगली छाप निर्माण करतात.जिल्हाधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले श्रीकर परदेसी ह्यानी वैद्यकीय शिक्षण घेऊन पदवी मिळवली.ते डॉक्टर म्हणून काम न करता स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी सनदी अधिकारी झाले. डॉ.श्रीराम लागू देखील डॉक्टरची पदवी घेतली पण त्यांनी आपली चमक कला क्षेत्रात दाखवली.अनेक चित्रपटातील त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली.नटसम्राट नाटकाला त्यांच्या भूमिकेनं अजरामर केले अन् तेही अविस्मरणीय ठरले.
  काही माणसं एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरले. पण दुसऱ्या क्षेत्रात कमालीचे यशस्वी झाले.
सचिन तेंडुलकर हे क्रिकेट क्षेत्रात देव मानले गेले, त्यांना शैक्षणिक यश मात्र मिळवता आले नाही.म्हणून काही ते अपयशी ठरत नाहीत.एखादी लढाई हरवली म्हणजे दुस-या लढाईतही पराभूत होतो असे काही नसते. काही लढाया हरूनही  युद्ध जिंकता येते.
 अनेक यशस्वी ठरलेल्या माणसांना अनेकदा पराभवाचे तोंड पाहावे लागेल आहे.एखाद्या क्षेत्रातील माघार,त्या क्षेत्रातील अपयश म्हणजे संपूर्ण जीवन अपयशी असे काही नसते.एखाद्या वेळी पराभूत होणे ही बाब वाईट नाही तर पराभूत मानसिकतेत जगणं लाजिरवाणे ठरते.भिका-याच्या भूमिकेत जगून राजा होता येतं नाही.अडवल्याने,थोडा वेळ थांबल्याने माणसं लहान ठरत नाहीत तर उमेद गमावून बसून नकारात्मक विचार करून आता काहीच करायचे नाही.हरी हरी करत राहावं.लोक हरामखोर आहेत.उपकारीची जाणीव ठेवत नाही.कपटी आहेत.काहीजण तर उपकाराची परतफेड अपकाराने करतात.कसं सहन करावे.काहीजण
दुतोंडी , विश्र्वास घातकी आहेत. कुणासाठी काहीही आणि कितीही काम करुनही चांगली फळे मिळायचे तर सोडाच पण वाईट अनुभव आले.ज्यांना जीव लावला ती माणसं जीव घेण्याचा विचार करतात ,ही अतिशय वेदनादायी बाब आहे.आता या पुढे काहीच करायचे नाही म्हणून सेवा,काम, चांगुलपणा सोडून देऊन आपल्याच कोशात गुंग होणं फार मोठं अपयश आहे.थोडी माघार घेतली तरी काही हरकत नाही ;पण  क्षमता, कौशल्य, शहाणपण आणि नवं काही तरी करून दाखवायचे वय असताना कायम स्वरूपी थांबण्याच्या निर्णय हा आत्मघातकी निर्णय ठरतो. पराभव, फसवणूक, वाईट अनुभवाना पचवून,त्यावर मात करून त्याचं किंवा अन्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली तरी यशाचा डंका वाजवता येतो,हे अनेकांनी दाखवून दिले आहे.घरात अनेक दिवसांपासून असलेला अंधार उजेड निर्माण करताच निघून जातो तसं यशात अपयश पुसून टाकण्याची शक्ती आहे.अब्राहम लिंकन हे अनेक निवडणूका हरत गेले.शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
अपयशाला यशात रूपांतर करण्याची हिंमत आणि हिकमत ज्यांच्या ठिकाणी आहे ती माणसं यशोगाथा निर्माण करतातच,हे अनेकांनी दाखवून दिले.यशोगाथा तयार होऊ लागल्या की,माथा टेकवायला माणसं तयार आहेतच.लपून छपून वार करणारे, अंगात वारं भरल्या सारखं विरोधात बोलणारे  अनेकजण पुष्पहार घेऊन तयार राहतील . उघड वार करणारेही कौतुक करतील.त्यामुळे बदल घडतच नाही असा विचार न करता बदल घडतोच अन् पहा तसा बदल घडवून दाखवतोय असा विचार करून वाटचाल केल्यास नक्कीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात चांगले यश मिळते.
डॉ. हनुमंत भोपाळे
9767704604


bhopale hanumant hanumantbhopale@gmail.com

19:46 (1 minute ago)
to me
मनं तोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द मनं जोडण्यासाठी उपयोगाचे नसतात.
   - डॉ हनुमंत भोपाळे

एखाद्या कारणांमुळे  अनेक वर्षे एकत्र असलेले दोन मित्र
मनानं दूर जातात.तरीपण सुखदुःखात एकमेकांना एकमेकांची आठवण येते.
लक्षात येते, खरंच मैत्रीचा बळी देऊन दूर होण्याइतके मोठे कारणं घडले नव्हते.रागाच्या भरात बोलून दूर गेलो,याची खंत अनेकांना वाटते.
 खरंच जिव्हाळ्याच्या माणसाइतका अहंकार महत्त्वाचा आहे का? मन दुखावले म्हणून काय मैत्रीचा बळी घ्यायचा असतो का ? मन माणसांच्या शब्दांमुळे दुखावलं जातं नाही त्या शब्दांना सहन करू न शकल्यामुळे, दुखावल्या जाते.एवढी सहनशीलता आपण कमावली नाही का? खरंच शब्दांना काही किंमत असते,वजन असते का?वजन असलं तरी आपल्या वजनापेक्षा अधिक वजन नसेल ना?मग हे शब्द माणसाला का बरं छळतात.मनबुध्दीच दळण करतात.
खरं तर शब्दांना आपण जितकी किंमत देतो तितके ते वजनदार, टोकदार होतात.नको वाटणा-या शब्दांनी कोमल नात्यावर प्रहार झाल्यास  मन जखमी होते.
 मैत्रीला ,नात्याला हळूवार,कोमल,प्रेमळ,धीर आणि आधार देणा-या शब्दांची गरज असते तर वाद करून माणसं दूर करण्यासाठी, त्यांना नामोहरम, अपमानित करण्यासाठी धारदार, तीक्ष्ण शब्दांची गरज असते.
.मनं तोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द जोडण्यासाठी उपयोगाचे नसतात.मग आपल्याला माणसं जोडायची आहेत की तोडायची आहेत, याचा विचार केला पाहिजे.
गैरसमज,लावालावारूपी इंधन मिळाले की,शब्द शस्त्राचं
रूप धारण करतात.
 असे शब्द मनाला जखमी करतात. जखमी झालेले मन वार केलेल्या मनाशी सहसा मिळून मिसळून प्रेमानं वागू शकत नाही. त्याचा दूर राहण्याकडे कल असतो.
दुराव्यातून दुरावा वाढतो. प्रेम, सेवा,नम्रता,क्षमा मागून  हा दुरावा हळूहळू कमी करता येऊ शकतो. याशिवाय गैरसमजामुळे दूर गेलेली माणसं  सत्यता कळली की, जवळ येऊ शकतात.पण बराच काळ हातातून गेलेला असतो.
आता भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे,असे मनात विचार येऊन जातात.
 भेटावे, बोलावं वाटलं तरी
 सुरूवात कुणी करायची असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो?
 अहंकारामुळे बोलत नाहीत. मी बोलायला तयार आहे, पण त्यांनं स्वत:हून
बोललं पाहिजे.त्याला गरज नसेल तर मग माझं काय अडलय,तो कोण कुठला लागून गेलाय , असेल गरज तर तो बोलेल,असा विचार करून मैत्रीचा हात पुढे करत नाहीत. मैत्रीसाठी हात पुढे न करणे मैत्रीचा घात करणं असू शकते.
        पुढच्या व्यक्तींच्या, मित्रांच्या ठिकाणी असलेले गुण,त्यांनं केलेले सहकार्य, मैत्रीचे महत्त्व लक्षात घेऊन कुणी तरी मन मोठं केलं पाहिजे.
जी माणसं स्वत:ला समर्थ समजतात,त्यांनी तरी मोठ्या मनानं मैत्रीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
आपण जर पुढाकर घेतला,स्वत:हून बोललो अन् त्यानं नीट प्रतिसाद दिला नाही तर विनाकारण नामुष्की होईल.तो पुन्हा कधी म्हणेल की,तुच आला होतास. मी आलो नव्हतो.मी बोललो नव्हतो.
खरंच किती विचार करते दुबळे मन.दुबळं मन, दुबळे विचार   आनंद देऊ शकत नाहीत.
      मैत्रीची जाळ विणत, मैत्री टिकून ठेवत जी माणसं पुढे जातात. कुठे कधी पटलं नाही, खटकले तरी चालत राहते, शेवटी माणूसं आणि माणुसकी महत्त्वाची आहे?  अहंकाराची टोपली बाळगून उपयोग आहे का? असा विचार करून अहंकारापेक्षा मित्र  महत्त्वाचा आहे.असा विचार करणारी माणसं मैत्रीभाव जागृत करून मन जुळवायला, जोडायला, घडवायला पुढे येतात ती माणसं खरंच मनानं मोठी असतात.छोट्या मनाच्या माणसांना मोठ्या मनाची,उंचीची माणसं समजायला वेळ लागतो.
 दुरावा ठेवून दुःखी होत बसण्यापेक्षा नक्कीच मैत्री,प्रेम, जिव्हाळा मोलाचा आहे,ही जाणीव ठेवून दूर गेलेली मनं एकत्र आणण्यासाठी सुईदो-याची भूमिका पार पाडणारी ,मैत्रीचा पूल बांधून देणारी माणसं महानच असतात.अशांची  संख्या कमी असते.आग लावणा-याची संख्या  मात्र विपुल दिसते.
डॉ .हनुमंत भोपाळे
9767704604