Friday 13 December 2019

आत्मबळ खूप महत्त्वाचे आहे
               डॉ हनुमंत भोपाळे
मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी असंख्य माणसांना रात्रंदिवस काबाडकष्ट करावे लागतात.या कष्टाचं अनेकांना काही दुःख वाटतं नाही.ते दिवसभर कष्ट करून गाढ झोपी जातात.अशा अवस्थेत त्यांची तब्येत चांगली राहते.सुखासमाधानाने जगणा-या या माणसांच्या जीवनात जेव्हा आजार,कर्ज,कलह, कोर्ट कचे-या, बेरोजगारी, नापिकीमुळे नुकसान या गोष्टी  येतात तेव्हा ते अत्यंत दुःखी, भयभीत, चिंताग्रस्त होतात.  जगण्यात काही मजा वाटत नाही, जगणं सजा वाटायला लागते.प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकत नाही ,असे वाटत नाही तेव्हा ख-या अर्थाने खच्चीकरण होते. स्वत:च
आपण आपले जितके मानसिक खच्चीकरण करून घेतो तितके खच्चीकरण जगातील कोणतीही शक्ती करीत नाही.
प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी मानसिकशक्ती,आत्मबळ खूप मोलाची मदत करते. हे कसं वाढवायचं हे समजून घेऊन थोडे पथ्य आणि थोडे परिश्रम घेण्याची गरज आहे.क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाचा उपयोग केल्यास निश्चितच जीवनातील दुःख दूर होण्यास मदत होते.
विचार बदल्यास,कृती बदलल्यास जीवनात परिवर्तन घडून येतेच.
 प्रतिकूल परिस्थितीने निराश, उदास झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्याला पहिल्यांदा होय, नक्कीच तू ही परिस्थिती बदलू शकतोस,याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल केलेल्या माणसांच्या चरित्र, आत्मचरित्राचे वाचन केल्यास नक्कीच फायदा होईल.
माझ्याच नशीबाला असं का?या प्रश्नातून मुक्तता होण्यास असे ग्रंथ मदत करतात. कुणी कुणी ,कशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीला हाताळले याचा शोध घेतला पाहिजे. आपणही त्यांनी निवडलेल्या मार्ग आणि पध्दतीचा वापर करून बाहेर येऊ शकतो असे वाटले की, ब-याच प्रमाणात मानसिक ताण दूर होण्यास मदत होते.
 अंधार दूर करण्यासाठी आपण उजेडचं निर्माण करायला पाहिजे, उजेडाची सोय करायला पाहिजे.याशिवाय अंधार
दूर होतं नाही.ज्याच्या अभावामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे ती अनुकूल करण्यासाठी पहिल्यांदा मनोबल वाढविले पाहिजे.आत्मविश्वास, उत्साहाने उणिवा दूर करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले पाहिजेत.
नक्कीच यश मिळते.दगरथ मांझी यांनी माळ कोरून रस्ता तयार केला.त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन एक चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.बाबुराव केंद्र  यांच्या कार्यावर आधारित पाणी हा चित्रपट तयार झाला आहे. केवळ चित्रपट बघावेत म्हणून हे सांगत नाही तर सतत योग्य ते काम करून जीवन सुखी करण्यासाठी सिध्द झाले तर नक्कीच फायदा होते असे सूचित करायचे आहे. झपाटून काम केले चित्रपट निघणार नसला तरी आपली विचित्र झालेली परिस्थिती नक्कीच बदलू शकते.
कुणी तरी येईल आणि आपले दुःख, दारिद्र्य दूर करील
म्हणून वाट पाहण्यापेक्षा आपणच वाटचाल केली की, जीवन यशस्वी होते. 
एकजण, पायाला चप्पल नाही म्हणून रडत होता.बाजूला पाहतो तर एका व्यक्तीला दोन्ही पाय नसतानाही तो आनंदाने हसत होता.
रडणाऱ्या व्यक्तीने विचार केला, पहिल्यांदा हसत जगायला शिकू.
रडल्याने नाही तर लढल्याने, परिश्रम घेतल्याने विजय मिळतात.
चप्पल घ्यायला पैसे लागतात.हसायला अजून तरी पैसे मोजावे लागत नाहीत.
चप्पलसाठी लागणारे पैसे रडल्याने मिळणार नाहीत.काम केल्यानं मिळतात.काम केले की,दाम मिळतेच,असा विचार करून वाटचाल करणे निश्चितच फायदेशीर ठरते,असा करून त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि तो श्रीमंत झाला.
डॉ.हनुमंत भोपाळे
९७६७७०४६०४

No comments:

Post a Comment