Saturday 28 March 2020

हाताला काम देणं शक्य नसेल तर
कामगारांना शहरात बळजबरीने ठेवून घेता येईल का?
         डॉ हनुमंत भोपाळे
हाताला काम देणं शक्य नसेल तर
कामगारांना शहरात बळजबरीने ठेवून घेता येईल का?असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उष्णता वाढत असताना
चोहोबाजूंनी पत्रे असलेल्या रूममध्ये दिवसभर राहणे  विलक्षण वेदनादायी ठरणार आहे.ही बाब लक्षात घेऊन गावाकडे काही दिवस झाडाखाली थंड बसून तरी राहता येईल. गावात गेललो तर कमी खर्चात उदरनिर्वाह होईल.उधारी,उसणपासणं मिळेल.
याशिवाय शिधापत्रिका गावात आहे,थोडी शेती नावावर असणा-यांना एप्रिल मध्ये दोन हजार रूपये मिळणार आहेत,गोरगरिब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप, उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस, स्वस्त धान्य दुकानात  मोफत,रास्त भावाने अन्नपुरवठा याचा लाभ गावाकडे मिळेल .शिक्षापत्रिकेवर नाव गावात असते.अनेक कामगारांना शहरात ही सुविधा मिळालेली नसते.
किराया,लाईटबिलचा प्रश्र्न गावात नाही.
शेतातील कामे बंद नसल्याने शेतात मजुरी मिळेल,आपल्या थोड्याशा शेतीची मशागत करून घेता येईल यामुळे अनेक जण आपापल्या गावाकडे जात आहेत.
एकवीस दिवसांत हे प्रकरण मिटणार नाही असे वाटत आहे.तोपर्यंत काम बंद असताना रूमचा किराया कसा द्यायचा?काय खायचे?ह्या सतावणा-या प्रश्नांमुळे
गावाकडे जाण्याचा अनेक कामगारांनी निर्णय घेत आहेत. काहीजणांना वाटत आहे,समजा आजार झाला तर हाडं तरी गावात पडतील.अशी भावना निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत अन् मनःस्थिती असलेल्या , अडचणीत सापडलेल्या कामगारांना
बळजबरीने जेवायला देतो म्हणून थांबणे शक्य नाही.
अशा परिस्थितीत शासनाने यांची तपासणी करून
त्यांना गावी सोडणं हा चांगला मार्ग ठरेल.
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

No comments:

Post a Comment